रायवळ (गावठी) आंबा; हापूस आंब्याचा राजा असेल तर, रायवळ (गावठी) आंबा सर्वसामाण्यांसाठी डॉन पेक्षा कमी नाही.
उन्हाळा आला की शाळेच्या सुट्टी बरोबरच वेध लागतात ते आंब्यांचे. आंब्याच्या १००० पेक्षा जास्त जाती आहेत असे मानले जाते. त्यापकी सगळ्यांना परिचयाच्या जाती म्हणजे हापूस, पायरी, तोतापुरी अशा आहेत. उन्हाळा चालू झाला की बातमी येते की पहिली हापूसची पेटी बाजारात दाखल, पण भव ऐकून सामान्यांचे मात्र ती खरेदी करण्याचे धाडस होत नाही. हापूस जेव्हा मार्केट मध्ये येतो तेव्हा त्याची चांगलीच हवा मार्केट मध्ये असते. आंब्याचा राजा असं देखील त्याला म्हटल जातं. पण हा हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ही असतो अशातच एप्रिल मध्ये बाजारात येतो तो रायवळ जातीचा आंबा. काही गोड आंबट चव असणारा हा आंबा मात्र सर्वांना परवडणारा असतो. याच रायवळला आपण सगळे गावठी आंबा म्हणून ओळखतो. हापूसची जाहिरात पहिल्या पानावर येते तर याला मात्र कुठे तरी कोपऱ्यात जागा मिळते. हा आंबा कोकणासोबत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सगळ्याच ठिकाणी आ...