रायवळ (गावठी) आंबा; हापूस आंब्याचा राजा असेल तर, रायवळ (गावठी) आंबा सर्वसामाण्यांसाठी डॉन पेक्षा कमी नाही.
उन्हाळा चालू झाला की बातमी येते की पहिली हापूसची पेटी बाजारात दाखल, पण भव ऐकून सामान्यांचे मात्र ती खरेदी करण्याचे धाडस होत नाही. हापूस जेव्हा मार्केट मध्ये येतो तेव्हा त्याची चांगलीच हवा मार्केट मध्ये असते. आंब्याचा राजा असं देखील त्याला म्हटल जातं. पण हा हापूस सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर ही असतो अशातच एप्रिल मध्ये बाजारात येतो तो रायवळ जातीचा आंबा. काही गोड आंबट चव असणारा हा आंबा मात्र सर्वांना परवडणारा असतो.
याच रायवळला आपण सगळे गावठी आंबा म्हणून ओळखतो. हापूसची जाहिरात पहिल्या पानावर येते तर याला मात्र कुठे तरी कोपऱ्यात जागा मिळते. हा आंबा कोकणासोबत पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या सगळ्याच ठिकाणी आढळतो.
गावाकडे असणारी मुलं कधी शनिवारच्या दुपारच्या शाळेतून घरी येताना कुणाच्या तरी बांधावरील या आंब्याच्या झाडावरील कैऱ्या पडून घरातून आणलेलं मिठ तिखट लाऊन दात आंबतील तोपर्यंत खात, तर कधी शेतात दुपारच्या जेवणाबरोबर हाच आंबा सोबत करी. याचे झाड इतर झाडांच्या तुलनेत मोठ तर असतच पण त्याच बरोबर ते मातीही घट्ट पकडुन ठेवत. प्रतिकूल परिसथितीतही हे झाड तग धरून राहतं अन शेतकऱ्याला अंब्यासोबत थंड सावलीही देत. पूर्वी गावाकडे बऱ्याच जणांच्या बांधावर हे झाड हमखास दिसायचं. अन् एकदा पाड लागला की याचे आंबे शेतकरी स्वतः गावात आजूबाजूच्या लोकांना मोकळ्या हतेने वाटून राहायला विक्री करे.
पण आपण ज्या झाडावर सुर पारंब्या खेळलो, ज्या झाडाचे आंबे कधी दगड मारून पाडले, ज्या झाडा खाली उन्हाळ्याची सुट्टी घालवली त्याच झाडांची संख्या कमी होऊन ही गावठी (रायवळ) आंब्याची जातं संपुष्टात येत चाललीय. तरी आपण आपली गावठी रायवळ आंब्याची जात वाचूया. अन् पर्यावरणाला साथ देऊया.
खूपच छान माहिती 👌🏻
उत्तर द्याहटवा