नागराज मंजुळे यांचा चित्रपट म्हणजे चित्रपट प्रेमींसाठी परवणीच असते. तसेच मागील आठवड्यामध्ये प्रदर्शित झालेला चित्रपट घर बंदूक बिर्याणी हा नागराज मंजुळे यांनी दिग्दर्शित केला आहे या चित्रपटांमध्ये नागराज मंजुळे स्वतः देखील आपल्याला काम करताना दिसतील, त्याचबरोबर मराठी इंडस्ट्रीतील मेगास्टार सयाजी शिंदे हे देखील या चित्रपटांमध्ये काम करताना आपल्याला दिसतात त्याचबरोबर सैराट मधील परशा म्हणजेच आकाश ठोसर आणि सैराट मधील इतर कलाकार ही आपल्याला यामध्ये बघायला मिळतील. अशी भाली मोठी स्टार कास्ट असताना हा चित्रपट प्रेक्षकांना चित्रपट गृहात नक्की खेचून आणू शकेल असे वाटत होते.
त्याचबरोबर या चित्रपटासाठी जवळपास ८ कोटी खर्च आल्याचे अनेक मीडिया आउटलेट सांगत होते. पण व्हायचं तेच झालं वेगळ्या स्टोरी लाईन वर आधारित असलेला चित्रपट प्रेक्षकांना भुरळ पडू शकला नाही. हा चित्रपट चांगली कमाई करेल अशी सर्वांनाच अपेक्षा होती.
थिएटरमध्ये आधीच कमी होत चाललेली प्रेक्षकांची गर्दी हा चित्रपट वाढवू शकेल असं वाटलं असलं तरी हा चित्रपटही कमाल करू शकला नाही. आधीच कमी असलेली गर्दी आणखी कमी होत गेली, अनेक ठिकाणी थिएटर्सच्या अर्ध्यापेक्षा जास्त सीट्स खाली पाहायला मिळाल्या. थेटर मध्ये परिस्थिती पाहता हा चित्रपट कितपत यशस्वी होईल यावरती प्रश्नचिन्ह उभं केलं जात आहे. ७ एप्रिल 2023 रोजी घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला. पहिल्याच दिवशी या चित्रपटाने 50 लाखांचा गल्ला जमवला. त्याचबरोबर शनिवारी आणि रविवारी प्रेक्षकांनी प्रचंड गर्दी केली आणि शनिवारी या चित्रपटाचा गल्ला 60 लाख रुपये तर रविवारी 75 लाख रुपये गल्ला जमवण्यात हा चित्रपट यशस्वी झाला. मात्र सोमवारपासून या चित्रपटाला प्रेक्षकांचा थंड प्रतिसाद पाहायला मिळाला.
सोमवार 20 लाख मंगळवार 19 लाख आणि बुधवार 23 लाख असा गल्ला जमवला. त्यामुळे पहिल्याच आठवड्यात या चित्रपटाने तीन कोटी पेक्षा कमी गल्ला जमवला. सध्या मुलांच्या परीक्षा चालू असल्यामुळे पालकांनी आणि मुलांनीही चित्रपट गृहाकडे पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे. पण हे चित्र पुढील आठवड्यापासून बदललेलं पाहायला मिळेल अशी आशा केली जातेय. हा चित्रपट बनवण्यासाठी नागराज मंजुळे यांना आठ कोटींचा खर्च आला होता आणि आत्तापर्यंत चित्रपटाने जमवलेला गल्ला पाहता दुसऱ्या आठवड्यात तरी हा किती कमाई करेल याची शाश्वती देता येत नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा