पुष्पा २ ची पहिली झलक पाहिली का हा प्रश्न प्रत्येकाच्या तोंडावर आहे. विषय आणि राडा अशाअसंख्य कमेंट्स आणि रिएक्शन यावर आलेल्या तुम्ही पाहिले आणि वाचल्याच असतील. ३ मिनिटांचा व्हिडिओ अल्लु अर्जूनच्या वाढदिवसानिमित्त लॉन्च करण्यात आला आणि खरी चर्चा झाली ती अल्लू अर्जुनाच्या लूकची. पोस्टर मध्ये पुष्पा निळ्या रंगात, हातात पिस्तूल, अंगावर साडी सुद्धा आहे आणि त्याच हाताच्या नखावर नेल पॉलिश शिवाय हातात सोन्याच्या बांगड्या आहेत आणि गळ्यात तर लिंबाच्या माळा आहेत. लोकांना वाटलेलं तो आधीच्या लुंगी नेसलेल्या आणि हातात बंदूक असलेल्या लूक मध्येच लोकांसमोर येईल पण झाले उलटच, असं म्हटलं जाते की पुष्पा च्या या लूक मागे एक धार्मिक गोष्ट आहे.
असं म्हटल जात की पुष्पा चा लूक तिरुपतीच्या आणि चित्तूरच्या गंगाम्मा जात्रावरून घेण्यात आले आहे. गांगम्मा जात्रा हे एक फोक फेस्टिवल आहे. जो कर्नाटक आणि आंध्र प्रदेश मध्ये काही भागात साजरा केला जातो. हा उत्सव साधारण सात दिवसांचा असतो आणि दरवर्षीच्या मे महिन्यात साजरा करण्यात येतो. या उत्सवात काही ठिकाणी देवीला मांसाहारी जेवण दिलं जातं आणि सात दिवसांमध्ये ठराविक दोन दिवसांमध्ये ही यात्रा निघते. या फेस्टिव्हलमध्ये पुरुष महिलांसारख्या साड्या करून महिलांसारखं नटून सजवून तयार होऊन या यात्रेत सहभागी होतात. हा उत्सव दरवर्षी तिरुपतीच्या तथ्या गुंता गंगम्मा मंदिरात साजरा केला जातो. आठवडाभर चालणाऱ्या या सणामध्ये वेगवेगळे विधी आहेत. सणाच्या काळात फक्त वेगवेगळे वेध परिधान करून दुष्टच शक्तींना घालवण्यासाठी आणि मंदिरामध्ये वेगवेगळ्या लोक देवतांसमोर प्रार्थना करण्यासाठी परंपरेचा भाग म्हणून वाईट शब्द उच्चारत मंदिराचा रस्ता क्रॉस करतात. त्यांच्या संपूर्ण शरीरावर चंदनाची पेस्ट लावलेली असते हे फक्त चकचकीत कपडे घालतात. पुजाऱ्याने शुभमुहूर्तावर मंदिरा बाहेर उभारलेली देवीची प्रचंड मातीची मूर्ती फोडून आठवडाभर चालणारा हा उत्सव संपतो.
चितूर आणि तिरुपती येथे पार पडणाऱ्या या जत्रेबद्दल वेगवेगळ्या समजुती आहेत. बाकी पिक्चर रिलीज झाला की सगळी कोडी सुटतीलच निर्मात्यांनी अजून पुष्पा 2 रिलीज ची तारीख जाहीर केलेली नाही पण रिपोर्ट नुसार हा चित्रपट २०२३ क्या शेवटी किंवा २४ क्या सुरवातीला आपल्या भेटीस येईल आणि पुन्हा एकदा इंटरनेट वर झुकेगा नही साला अशा रीलस् चा पाऊस पडलेला आपल्याला पाहिला मिळेल. तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्की सांगा.



टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा